मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. दस-याचे दिवशीं मी रात्रीं नवाबाकडे गेलों होतों, दौला व राज्याजी आदिकरून सर्व मंडळ जमा जालें होतें. नजरा जाल्यानंतर नवाबांनी मला पानदान देऊन रुकसत केलें. मागाहून दस-याची वस्त्रें ताषकार चोबी, पोषाग मजकडे पाठविला. रा छ. १० माहे रावल हे विज्ञापना.

श्री.
आश्विन शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, चेनापटणाहून व्यंकटराम दिला याजकडून प्रस्तुत दोन अखबारा आल्या त्या रा केल्या आहेत. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेंसी प्रविष्ट करतील. यावरून मार ध्यानात येईल रा॥ छ. १० माहे रावल हे विज्ञापना,

श्री.
आश्विन शु. २ सोमवर शके १७१५. ते आश्विन शु.११ में. आश्विन शु.१२. अखबार ई छ. १ रावल ता छ, ९ माहे मारि. राछ. १० रावल. छ. १४ रोज रवाना टपा. रावल.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries